उसेगाव स्मशानभुमीजवळील घटना
नेरी (Neri Crane fire) : चिमूर तालुक्यातील उसेगांव येथील स्मशानभुमी जवळ आज दि. ७ जुनला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास या मार्गाने क्रेन जात असताना क्रेनश पोलला धक्का लागल्याने विजेच्या तारा क्रेनवर पडल्याने शार्ट सक्रीट होवून क्रेनला आग लागली. यात क्रेनच्या चालकाला वीजेचा शॉक लागल्याने त्याना तात्काळ चिमूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.
एम के एस कंपनीची मालमत्ता आणण्यासाठी नेरी – उसेगांव मार्गे पळसगांव येथील मटेरीयल शीप्टींगसाठी खुराणा यांच्या मालकीची क्रेन जात होती. या क्रेनवर अमन खोब्रागडे हा चालक होता. क्रेन मार्गक्रमण करीत असतानी उसेगांव जवळील स्मशानभुमी जवळ रस्त्यालगत असलेल्या पोलला क्रेनचा स्पर्श झाला.यामुळे पोलवरील तारा तुटल्याने लगेचच (Neri Crane fire) शार्ट सक्रीट होवून क्रेननी पेट घेतला. या क्रेन चालकाला सुध्दा शॉक लागला, वेळ न घालवता चालकांनी कॅबीनमधुन उडी मारली व क्रेन मधील हेल्परने तात्काळ याची माहिती देत गाडी बोलावून चालकाला वैद्यकीय उपचारासाठी चिमुरला पाठविले.
सोबतच विद्युत विभागाला घटनेची माहिती देवून उसेगांवचे येथील लाईट बंद करण्याचे सांगितले. चिमूर नगर परीषदेची अग्नीशमन दलाची गाडी वेळेवर पोहचुन क्रेनला लागलेली आग (Neri Crane fire) विझविण्यात आली. पण यात काही प्रमाणात क्रेन जळाली. एम.एच.-४० सी.एच.६१९१ असा क्रेनचा क्रमांक आहे. समयसुचकेतेमुळे होणारी जीवीतहानी टळली. चिमूर पोलीस घटनास्थळी पोहचुन घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन धारणे, पोलीस हवालदार आंनद डांगे करीत आहे.




