गेल्या दीड वर्षात निटूरमध्ये झालेला चौथा आवाज
रमेश लांबोटे
निटूर (Nitur Earthquake) : निलंगा तालुक्यातील निटूर व निटूर परिसर सोमवारी (दि.७) पुन्हा मोठ्या गूढ आवाजाने हदरला. दुपारी ३.१५ वाजता रहस्यमय गूढ आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गेल्या दीड वर्षांपासून झालेला हा (Nitur Earthquake) चौथा गूढ आवाज आहे.
निटूर परिसरात ४ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिल्यांदा जमिनीत मोठा आवाज झाला होता. लागलीच तीन दिवसानंतर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पहाटे ३ च्या दरम्यान पुन्हा असाच मोठा गुढ आवाज झाला होता त्यानंतर निटूर परिसरात ३ एप्रिल रोजी पुन्हा ठीक ११ वाजता असाच आवाज झाला. नंतर सोमवारी (दि.७) एप्रिल रोजी दुपारी ३.१५ वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान (Nitur Earthquake) पुन्हा असाच मोठा आवाज झाला. महसूल प्रशासनाने निटूरमध्ये येऊन पहाणी करून नागरिकांसमवेत चर्चा करावी. तसाच मागच्यापेक्षा मोठा आवाज निटूर परिसरातील ताजपूर, मुगाव, निटूरमोड इतर गावात हा आवाज जाणवल्यामुळे आवाजाची ही मालिका सुरूच आहे.
सोमवारी झालेला हा आवाज इतका मोठा होता की, अनेकांनी घरावरचे पत्रे हादरल्याचे सांगून हा आवाज कशाचा झाला? अशी विचारणार नागरिक एकमेकांना करत होते. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना हा आवाज तीव्रपणे जाणवला असल्याचे शेतकरी युसुफ शेख, व्यापारी दत्ता पाटील, अभिषेक बुडगे, सुधीर मगर, योगेश सरकाळे, राम सोनवळकर यांनी सांगितले.
भूकंप मापन केंद्रावर नोंद नाही…
निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागच्या ३ वेळेस निटूर परिसरात झालेल्या आवाजाची कसलीही नोंद भूकंप मापन केंद्रावर झाली नसल्याचे सांगितले. आज परत आम्ही आपत्ती व्यवस्थापन लातूर यांच्याशी संपर्क करून नेमका आवाज कशाचा होतोय? याची माहिती घेतो, असे सांगितले.
आमदार निलंगेकर आणि लक्ष घालावे…
निटूर व परिसरात ही आवाजाची मालिका दीड वर्षापासून सुरू असल्यामुळे प्रशासनाने भूगर्भ शास्त्रज्ञांना निटूरला पाठवून नेमका आवाज कशाचा होत आहे याची पाहणी करावी व निटूर येथील भयभीत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी निटूर व (Nitur Earthquake) निटूर परिसरातील गावचे नागरिक करत आहेत व तसेच माजी मंत्री व सध्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर निटूर व निटूर परिसरातील भयभीत झालेल्या जनतेकडे लक्ष देतील का याचीही चर्चा केली जात आहे.