परभणी (Parbhani):- येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने रविवार २० ऑक्टोबर रोजी जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथे कारवाई करत ८७ हजार ६९८ रुपये किंमतीचा गुटखा आणि एक चारचाकी वाहन मिळून ५ लाख ८७ हजार ६९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेची जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथे कारवाई
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनीवाल यांच्या नियंत्रणात पो.नि. अशोक घोरबांड, पोउपनि. अजित बिरादार, पोलिस अंमलदार सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, राम पौळ यांच्या पथकाने कारवाई(action) केली. पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत असताना या पथकाला जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथे गुटखा असल्याची माहिती मिळाली. यावरुन छापा टाकण्यात आला. कारवाईत राजनिवास, व्ही १ तंबाखु, प्रिमियम झेड १ जाफरानी जर्दा, विमल असा गुटखा (Gutkha) मिळून आला. या प्रकरणी पोलिस अंमलदार सिध्देश्वर चाटे यांच्या फिर्यादीवरुन सुनिल प्रभाकर सानप, गोविंद कांदे, पैâजल, वैâलास भांबळे, सुनिल बोराडे, मामु यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउपनि. ए.पी. बिरादार करत आहेत.