मानोरा (Washim):- गोर बंजारा धर्मपीठ भक्तिधाम येथे दि. २७ जून रोजी भटके विमुक्त व ओबीसीचे (OBC)नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघमारे, प्रा.पी.टी चव्हाण व असंख्य कार्यकर्त्यानी धर्मपीठाचे दर्शन घेऊन धर्मगुरु जितेंद्र महाराज यांचे आशीर्वाद घेतले. प्रा . हाके यांनी अतिशय शांततेत ओबीसीला आरक्षण मिळावे, याकरीता उपोषण केले आहे. शासनाने दखल घ्यावी, आणी राज्यातील सामाजिक सलोखा कायम राहावे यासाठी पुढील आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे जितेंद्र महाराज यांनी सुचविले. याप्रसंगी धर्मपिठावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे(National Banjara Council) राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड, प्रदेश उपाध्यक्ष श्रावण पवार, राज्य संघटक नारायण चव्हाण, उद्धव पवार व अविनाश राठोड व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Washim: शांततेत ओबीसीला आरक्षण मिळावे; शासनाने दखल घ्यावी

Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics