परभणी (Parbhani) :- रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गुरुवार ३० जानेवारी रोजी महामार्ग पोलिस केंद्राच्या सपोनि.अर्चना करपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सपोनि करपुडे यांनी वाहतुक नियम व रस्त्यावर होणारे अपघात (Accidents)टाळण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये अशा सूचना
महामार्ग पोलिस केंद्रातर्पेâ सकाळी सुपर मार्केट, वसंतराव नाईक पुतळा, शिवाजी नगर, गौतम नगर परिसरातून रॅली काढण्यात आली. यावेळी पोउपनि. नाटकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांनी विना लायसन्स वाहन चालवू नये, पालकांनी देखील अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये अशा सूचना केल्या. यावेळी महामार्गचे पोहेकॉ घरजाळे, पोना. भराडे, गणेश वाघ, सुरेश वाघ, अझहर, रमिज, कदम, मारवाड, शिंदे, मुख्याध्याप एन.डी. माळोदे, श्रीमती मारमवार, अमर हत्तीअंबीरे, जाधव आदींची उपस्थिती होती.