जिल्ह्यातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांच्या वेतनाची समस्या सुटता सुटेना!
वेतन अधीक्षकांचा मनमर्जी कारभार
केसलवाडा/वाघ (Superintendent Office) : जिल्ह्यातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतनाची समस्या दर महिन्याला सातत्याने सुरू आहे. यातच भर म्हणजे माहे मे पेड इन जून चे वेतन आज तारखेपर्यंत कर्मचार्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे जिल्ह्यातील ३८०० वर कर्मचार्यांना दर महिन्याला वेतनाविना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
त्यात भर म्हणजे वेतन अधीक्षक कार्यालय (Superintendent Office) व शिक्षणाधिकारी कार्यालय येथील भोंगळ कारभार जिल्ह्यातील एका ख्यातनाम शाळेतील मृत कर्मचार्यांच्या थकीत वेतनाचे देयक सदर कर्मचार्यांच्या बंद असलेल्या बँक खाते क्रमांक सह कोषागाराला सादर करण्यात आले. ते देयक कोषागार कार्यालयाच्या सिस्टीम मध्ये येलो बिल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील वेतन अधीक्षकाकडून पारित होणारे सर्वच वेतन देयके कोषागाराने थांबवले.
ही समस्या सोडवण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे गंगाधर भदाडे व शिक्षक भारती संघटनेचे प्रवीण गजभिये, विनोद हटवार, दिनेश कांबळे जयंत लाडे यांनी पुढाकार घेऊन कोषागार अधिकार्यांना विनंती करून एन आय सी मुंबईवरून येलो झालेले बिल आज दिनांक १३ जून २०२५ ला सकाळी साडेदहापर्यंत समस्या निराकरण करून घेतली. वेतन अधीक्षकांच्या लॉगिन वरून आदेश काढून जिल्ह्यातील सर्वच लेखाशीर्षणवर शिक्षणाधिकार्यांच्या स्वाक्षर्या करून आजच्या आज तात्काळ प्रभावाने वेतन बिले कोषागारास सादर करणे अपेक्षित असताना सुद्धा (Superintendent Office) वेतन अधिक्षक जिल्हा भंडारा १२.३० पर्यंत कार्यालयात उपस्थित होत नसतील तर वेतन आदेशांवर स्वाक्षर्या किती वाजे घ्यायचा हा प्रश्न कर्मचार्यांसामोर निर्माण झाला आहे. वेतन अधिक्षक जिल्हा भंडारा कार्यालयात वेळेवर न उपस्थित राहणे सातत्याचेच झाले आहे असे निदर्शनास येते.
याविरुद्ध अनेक वेळा जिल्ह्यातील संघटनांनी विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहेत. जिल्ह्यात वेतनाच्या व कार्यालयातील भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी असताना सुद्धा शिक्षण विभागातील अधिकारी अशा पद्धतीने नियमाला पायदळी तुडवून काम करत असतील तर यांच्यावर वरदहस्त कोणाचा हाही प्रश्न यावेळी निर्माण होतो. (Superintendent Office) शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचार्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ बंधनकारक नाही का? काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन अधिकारी कर्मचार्यांना निश्चित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व सेवा हमी कायद्यानुसार काम करण्याची सूचना द्यावी अशी भावना शिक्षक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांमध्ये निर्माण होत आहे. नियमित वेतन बिलांसह वैद्यकीय देयके, रजा रोखीकरणाचे देयके, थकीत देयके, जी पी एफ अदा देयके यासह कार्यालयातील अनेक महत्त्वांच्या बाबींवर स्वाक्षर्या करण्यास उशीर होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
वेतन अधीक्षक कार्यालयात अधिकारी सातत्याने वेळेवर उपस्थित राहत नाही. हे निदर्शनास येते वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन समज देण्याची गरज आहे. वेळेवर उपस्थित न राहिल्यामुळे कार्यालयातील सर्वच कामे दिरंगाईने होतात. स्वाक्षर्यांचा प्रश्न निर्माण होतो. यापुढे वेतन अधिक्षक जिल्हा भंडारा व शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी वेळेच्या आत कार्यालयात उपस्थित राहत नसतील त्यामुळे शिक्षकांच्या वेतनांवर व कार्यालयीन कामावर परिणाम होत असेल तर संघटना म्हणून आम्ही कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू.
-विनोद किंदर्ले, मुख्य कार्यवाह शिक्षक भारती संघटना जिल्हा भंडारा
जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालय वेतन अधीक्षक कार्यालय येथे अनेक कामासंबंधी टेबल नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापकांचे प्रस्ताव पेन्शनचे प्रस्ताव वैद्यकीय प्रस्ताव वेतना संबंधी निर्माण झालेल्या समस्या याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. कामाचे वाटप करावे अधिकारी कर्मचारी यांनी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहून कामे पूर्ण करावे. एवढी जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या वतीने अपेक्षा बाळगतो अन्यथा मोठे आंदोलन उभारून पाच दिवसाचा आठवडा, साडेनऊ ते सहाची वेळ व सेवा हमी कायदा अधिकारी कर्मचार्यांच्या लक्षात आणून दिल्या जाईल.
-सैनपाल वासनिक, अध्यक्ष शिक्षकेतर कर्मचारी संघ जिल्हा भंडारा.