महसूल अधिकार्यांच्या बदल्या!
परभणी (Officers Transfer) : महसूल विभागातील अधिकार्यांच्या (Revenue Department Officials) बदल्या करण्यात आल्या आहेत. उपजिल्हाधिकारी, नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. परभणीचे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे (Sub-Divisional Officer Dattu Shewale), पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची बदली झाली आहे.
महसूल व वन विभागाने काढले आदेश!
उपजिल्हाधिकारी संवर्गातील उपविभागीय अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. परभणी जिल्ह्यातील दत्तू शेवाळे, शैलेश लाहोटी या अधिकार्यांची बदली झाली आहे. संबंधित दोन्ही अधिकार्यांचा कार्यकाळ जिल्ह्यात नोंद घेण्यासारखा राहिला आहे. दत्तू शेवाळे यांनी निवडणूक व इतर काम चोखपणे बजावले. त्यांची उपविभागीय अधिकारी उमरगा जिल्हा धाराशिव येथे बदली झाली आहे. त्याच प्रमाणे पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची जिल्हा पुनर्वसन अधिकारी जालना या ठिकाणी बदली झाली आहे. नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले श्रावण श्रीरंग क्षिरसागर हे उपजिल्हाधिकारी सामान्य म्हणून परभणी येथे येत आहेत. त्याच प्रमाणे उपजिल्हाधिकारी विशेष भुसंपादन अधिकारी मांजरा प्रकल्प – 1 धाराशिवचे उदयसिंह भोसले यांची उपविभागीय अधिकारी परभणी म्हणून बदली झाली आहे.
बदल्यांबाबत 30 मे रोजी आदेश काढण्यात आले!
नायब तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. पूर्णा येथील नायब तहसिलदार कृष्णाजी मस्के (Deputy Tehsildar Krishnaji Maske) यांना सध्या कार्यरत पदावर सेवानिवृत्ती पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालम येथील नायब तहसिलदार राजेश्वर पवळे यांची नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे बदली झाली आहे. गंगाखेड येथील नायब तहसिलदार सुनील कांबळे यांची पालम येथे, जिंतूर येथील नायब तहसिलदार ज्ञानेश्वर घोंगडे यांची सोनपेठ तहसिल कार्यालयात (Tehsil Office) बदली करण्यात आली आहे. बदल्यांबाबत 30 मे रोजी आदेश काढण्यात आले आहेत.