सानगडी जवळील सासरा येथील घटना
भंडारा (Woman Stabbing Case) : साकोली तालुक्यातील सानगडी जवळील सासरा येथे दि. ११ जुलै रोजी सायंकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तरुणाच्या काकूवर चाकूने वार (Woman Stabbing Case) करून जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. विलास पोहणकर (४२) रा. सासरा असे आरोपीचे नाव असून जसवंता उपरीकर (६१) असे जखमी महिलेचे नाव आहे.
सानगडी जवळील सासरा येथील आरोपी विलास पोहणकर याच्या (Woman Stabbing Case) पत्नीचे जखमीच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. दीड वर्षापूर्वी आरोपी पतीने जखमी व तिच्या पुतण्यासोबत कडाक्याचे भांडण केले होते. तेव्हापासून आरोपी हा जखमीच्या परिवाराला जिवाने मारण्याची धमकी देत होता.
घटनेच्या वेळी जखमी ही घरासमोर बसली असताना आरोपीने तिच्याजवळ जाऊन ‘तुमच्यामुळे माझी पत्नी सोडून गेली’ असे बोलून त्याने त्याचेजवळील चाकून जसवंता हिचा छाती, पोट, हात तसेच पायावर (Woman Stabbing Case) चाकूने सपासप वार करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ गावात भितीचे वातावरण पसरले होते. जखमीला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. जखमीच्या बयाणावरून साकोली पोलिसात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.