दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा राहणार ठप्प
कळमनुरी (Kalmanuri Nagar Parishad) : नवरात्रीसारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर कळमनुरीकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. नगर परिषदेच्या (Kalmanuri Nagar Parishad) नियोजनशून्य कामामुळे आणि कडपदेव पंपिंगस्टेशनमधील तांत्रिक बिघाडीमुळे शहरातील पाणीपुरवठा तब्बल दोन दिवस ठप्प राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
सणासुदीत घराघरांत पूजा-अर्चा, व्रतवैकल्य, पाहुणचार यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असते. मात्र (Kalmanuri Nagar Parishad) नगर परिषदेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नवरात्रीतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून, हा निर्णय परिषदेच्या नियोजनशून्यतेचे दर्शन असल्याची टीका होत आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
कळमनुरी शहराला पाणीपुरवठा (Kalmanuri Nagar Parishad) करणाऱ्या कडकदेव“पंपिंगस्टेशन तांत्रिक बिघाड झाली असुन या कामांना दोन दिवस लागणार असून, त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. या काळात नागरिकांनी सहकार्य करावे.” असे आवाहन कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांनी केले आहे.




