Patur:- स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या शिक्षणाच्या जगणे घडण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची भूमिका राबवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत पातूर शहरातील विविध कार्यालयात वृक्ष वाटप करण्यात आले.
शहरातील विविध शासकीय कार्यालयात वृक्ष वाटप
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वनसंपदेचे संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून व ग्लोबल वॉर्मिंग (Global warming) सारख्या मोठ्या संकटाला समोर जात असताना वृक्ष संवर्धन एक मात्र उपाय असताना वृक्ष वाटप एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पातुर तहसीलच्या तहसीलदार यांना कार्यालयाच्या परिसरात वृक्ष संवर्धन करण्यासाठी वृक्ष वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाला नांदखेड सरपंच हरिदास माने बोडखा सरपंच विकास वानखडे उपसरपंच मंगेश डाखोरे शिरपूर सरपंच आसिफ भाई निखिल इंगळे उस्मान भाई प्रामुख्याने उपस्थित होते तर सदर उपक्रमाला सहकार्य नरेगा कर्मचारी संदीप आगे, संतोष इंगळे नागेश जयस्वाल दीपक ताले यांचे लाभले.