खमारी/बुटी (Truck Accident) : भंडारा जवळील बायपास महामार्गावर सालेबर्डी गावाजवळ दि.१८ जुलै रोजी रात्री ८ वाजता दरम्यान दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एक ट्रकचालक जखमी झाला. जखमीला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्यारेलाल मुन्नीलाल राजभर (४५) रा. वळधामना (नागपूर) असे जखमीचे नाव आहे. जखमी हा आपल्या ताब्यातील ट्रक क्र.सी.जी.०४/एल.आर.१४४४ या ट्रकने रायपूरकडे जात असताना बायपास महामार्गावर सालेबर्डी गावाजवळ मागेहून भरधाव जाणार्या ट्रक क्र.एम.एच.४०/सी.टी.५९०७ च्या चालकाने समोरील ट्रकला मागेहून जबर धडक दिली. त्यात प्यारेलाल राजभर हा किरकोळ जखमी झाला. माहिती मिळताच जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळ गाठून (Truck Accident) जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
मोटारसायकल दुभाजकावर आदळली; दोघे जखमी
महामार्गावरील गडेगाव पुलावरील घटना
लाखनी () : महामार्गावरील गडेगाव उड्डाणपुलावर दि.१८ जुलै रोजी रात्री ८.१० वाजता दरम्यान भरधाव मोटारसायकल अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. त्यात दुचाकीस्वार दोघे जण जखमी झाले. त्यातील एक गंभीर जखमी असून दुसरा किरकोळ जखमी आहे. कमलेश चुन्नीलाल कुपवास (२२) रा. मानेगाव (सडक) व रोहीत रमेश मेश्राम (२३) रा. उज्वल नगर लाखनी असे जखमीचे नाव आहे.
जखमी हे घटनेच्यावेळी मोटारसायकल क्र.एम.एच.३६/ए.जे.३३१६ या गाडीने स्वगावाकडे जात असताना गडेगाव उड्डाणपुलावर चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने अनियंत्रित मोटारसायकल दुभाजकावर आदळली. त्यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जखमी झाले. त्यात कमलेश याच्या डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाला. तर रोहीत किरकोळ जखमी झाला. (Truck Accident) अपघात घडताच घटनास्थळी धाव घेत जखमींना जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.