Yawatmal :- अत्याधुनिक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार असून यासाठी १५ ऑगस्टची मुदत दिली आहे. पावणे पाच लाख वाहनांपैकी केवळ ५९ हजार वाहनांनाच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आल्या असून ४ लाख ११ हजार २७० वाहनांना अद्यापही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लागलेल्या नाही.जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर हि प्रक्रिया सुरु असून शासनाने १५ ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिली आहे.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले आहे. नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्याची चोरी व गैरवापर करता येतनाही. एखाद्या वाहनाला अपघात (Accident) झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते.एकूणच या सर्व बाबी लक्षात घेता आता सर्वच वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण ४ लाख ७० हजार १७७ वाहनांची नोंदणी असून त्यापैकी ५८ हजार ९०७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. आजघडीला ३३ हजार ३८८ वाहनांना हि प्लेट लागली असून ४ लाख ११ हजार २७० वाहनांना अद्यापही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लागलेल्या नाही. जिल्ह्यातील ४१ केंद्रांवर हि प्रक्रिया सुरु असून शासनाने १५ ऑगस्ट पर्यंत डेडलाईन दिली असताना आरटीओ विभागापुढे बाकी असलेल्या वाहनांना प्लेट बसविण्याचे आव्हान तयार झाले आहे.




 
			 
		

