पालम तालुक्यातील सादलापुर येथील घटना
परभणी (Palam Crime) : पालम तालुक्यातील सादलापुर येथे भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने (Palam Crime) आणि रोख रक्कम मिळून ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 15 जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजे दरम्यान घडली. सदर प्रकरणी अनोळखी चोरट्यावर (Palam Police) पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल
राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल धुळगुंडे यांनी तक्रार दिली आहे. मुलाच्या एमबीबीएस शिक्षणासाठी त्यांनी कापूस विक्री करुन आलेली रक्कम घरात ठेवली होती. 15 जुलै रोजी ते नेहमी प्रमाणे सेवेवर गेले. सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादीच्या मुलाने फोन करुन माहिती दिली. घरातील सर्वजण शेतात खत पेरणीसाठी गेले असता चोरी (Palam Crime) झाल्याचे सांगितले. विठ्ठल धुळगुंडे यांनी घराची पाहणी केली असता त्यांना रोख 3 लाख 85 हजार रुपये, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून (Palam Police) पालम पोलिस अधिक तपास करत आहेत.