परभणी (Gangakhed Crime) : गंगाखेड येथे पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पालघर पोलीसांनी शुक्रवार १ ऑगस्ट रोजी रात्री (Gangakhed Crime) गंगाखेड येथून चौघांना ताब्यात सोबत घेऊन गेल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पालघर जिल्ह्यातील वाणगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये दि. २९ जुलै मंगळवार रोजी दाखल असलेल्या (Gangakhed Crime) गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक मिराज पठाण यांना या गुन्ह्यातील संशयीत आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे व त्यांचे लोकेशन परभणीतील गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी येथे दाखवित असल्याने तपासासाठी गंगाखेड शहरात आलेल्या पालघर पोलीसांनी तालुक्यातील मालेवाडी येथून सुमित निवृत्ती गायकवाड वय २१ वर्ष, सारडा कॉलनीतील पियुष नितीन ठाकुर वय २१ वर्ष, प्रथमेश वैजनाथ पौळ वय २१ वर्ष व संविधान विवेक गायकवाड वय २१ वर्ष या चौघांना ताब्यात घेऊन शुक्रवार १ ऑगस्ट रोजी रात्री उशिराने पालघरकडे घेऊन गेल्याने गंगाखेड शहर व परिसरात एकच खळबळ उडाली असुन (Gangakhed Crime) गंगाखेड येथे राहणाऱ्या अवघ्या २१ वर्षाच्या तरुणांनी पालघर जिल्ह्यात कोणता गुन्हा केला असेल याबाबत चर्चा रंगत आहे.