ग्रामविकास मंत्री व पालकमंत्र्याकडे तक्रार!
बार्शी टाकळी (Panchayat Committee) : बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (Group Development Officer) व सहाय्यक लेखाधिकारी यांनी सादील खर्चाच्या काढलेल्या बिलाची तात्काळ चौकशी करून, जोशीवर कारवाई करावी. अशा प्रकारची तक्रार ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केल्यानंतरही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दोशीला वाचवीत असल्याच्या खमंग चर्चा सर्वत्र होत आहेत.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे दोशीला वाचविण्याचे प्रयत्न?
बार्शीटाकळी पंचायत समिती अंतर्गत 31 मार्च या कालावधीत सादिल खर्चा मधून खरेदी करण्यात आलेल्या खर्चामध्ये संगणक व प्रिंटर कार्यालयातील रंग रूम उटी वाय-फाय संच याबाबत करण्यात आलेल्या खर्चाचे कोणत्याही प्रकारचे दरपत्रक न बोलाविता संबंधित कंत्राटदाराच्या (Contractor) व काम करणाऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम जमात करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. आज पर्यंत प्राप्त साहित्याची नोंद साठा नोंदवही 32 मध्ये नोंद घेण्यात आली नाही. व काढलेल्या देखात कोणते प्रकारचे बिल सादर करण्यात आले नाही. ज्यांनी बिले काढले त्यांच्याकडे नसती उपलब्ध आहे. संबंधित भांडारपाल हा तीन महिने रजेवर असताना गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखा अधिकारी यांनी संगन मत करून ही बिले काढण्यात आल्याचे दिसून येते. सदर गंभीर घटनेची आपल्या स्तरावरून अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत करून सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई (Action) करावी. अशा प्रकारची तक्रार राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री, व अकोला जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे दिनांक 4 सप्टेंबरला विजय देशमुख यांनी केली आहे.
विषयाची सखोल चौकशी करून दोशीवर कारवाई करणे आवश्यक व बंधनकारक!
सदर गंभीर प्रकरणाची अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आतापर्यंत या गंभीर विषयाची सखोल चौकशी करून दोशीवर कारवाई करणे आवश्यक व बंधनकारक होते. परंतु अद्याप पर्यंत संबंधितावल कारवाई झाली नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून दोषीला वाचविण्याचे प्रयत्न चालू असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सर्वत्र होत आहेत. बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते नॉट रिचेबल होते.