जायन्ट्स ग्रुप ऑफ हिंगोली
सदभाव सेवाभावी संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचा उपक्रम
हिंगोली (Hingoli District Police) : येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आज पक्षांसाठी पाणपोई हा उपक्रम घेण्यात आला. गृह पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे आणि आर पी आय भगवान जाधव यांच्या हस्ते विविध झाडांवर या पाणपोई लटकविण्यात आल्या.
दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत चालली. माणसांना सुध्दा पाणी मिळण अवघड होतं चाललंय तिथं पक्षी किंवा मुक्या जनवारांचं निभाव कसा लागणार?
यामुळेच हे निसर्गचक्र आहे. त्याची काळजी घेणं हेही आपलंच कर्तव्य. याचं भूमिकेतून शहरातील विविध भागात आणि (Hingoli District Police) पोलीस अधिक्षक कार्यालयात पक्षांना पाण्याची सोय व्हावी म्हणून छोटे छोटे पॉट करून ते झाडावर लटकविण्यात आले. त्या पॉट मध्ये वेळोवेळी पाणी टाकण्यात येणार आहे.
यावेळी विनोद खरात, डॉ. गणेश अवचार, रत्नाकर महाजन, हर्षवर्धन परसवाळे, निळकंठ गायकवाड, संजय खिल्लारे, महेश शहाणे, पोलीस मास्टर जाधव, (Hingoli District Police) पोलीस शिपाई फोले, सदभाव आणि जायँट्सचे डॉ. अभयकुमार भारतीया यांची उपस्थिती होती.




