उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना पुरस्कार प्रदान!
लातूर (Panther Ratna Award) : पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पॅंथर संघटनेच्या वतीने युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे (Pankaj Bhau Kate) यांना सामाजिक कार्याबद्दल पँथर रत्न पुरस्काराने पुणे येथे सन्मानित करण्यात आले. दलित पॅंथरच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजसेवकांना पुरस्कार प्रदान केले जातात.
दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम प्रमुख उपस्थिती!
यावर्षी पुणे येथे दलित पँथरचे (Dalit Panther) राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या प्रमुख उपस्थितीत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आश्रुबा कांबळे, महाळंग्राचे सरपंच मार्शल माने, आण्णा कांबळे, उपस्थित होते, पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे स्वागत केले जात आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल लातूर येथील संपर्क कार्यालयात प्रवक्ते सुफी सय्यद शमशोद्दीन, संस्थापक सचिव राहुल लांडगे, संपर्क प्रमुख पंकज गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई आदमाने, युवा जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे, महेबुब भाई सय्यद, भूषण मांदळे यांनी पंकजभाऊ काटे यांचा सत्कार केला.