परभणी (Parbhani) :- गुढी पाडवा नववर्षाच्या मुहूर्तावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे भूमीपूजन माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल परिसरात राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर (Punyashloka Ahilyadevi Holkar) यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्याहस्ते भूमीपूजन
परभणी शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक (monument) उभारण्याची मागणी करण्यात येत होती. स्मारकासाठी जिल्हा क्रीडा संकुल परिसरातील जागा सुध्दा निश्चित करण्यात आली होती. भूमीपूजनाला (Bhumi Puja) विलंब लागत होता. मात्र गुढी पाडवा नवीन वर्षाचा मुहूर्त साधत माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्याहस्ते स्मारकाच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील, भाजपा युवा नेते सुरेश भुमरे, मारोतराव बनसोडे पैलवान, आण्णा डिगोळे पैलवान, शंकरराव वाघमारे, सूर्यकांतराव हाके, नारायणराव पिसाळ, अरविंद देशमुख, पांडूरंगराव लोखंडे, गोकुळ पैलवान लोखंडे, लक्ष्मणराव बोबडे, नंदु पाटील, भागवतराव दळवे, गणेशराव घोरपडे, गजानन जोगदंड, नितीन देशमुख, तुळशीराम गिराम, रमेशराव थिटे, कैलासराव खनपटे, अर्जुन खनपटे, सुदर्शन बनसोडे, विजयराव घोरपडे, बाळासाहेब ढोले, माणिकराव आव्हाड, आळसे, आकाश लोहट, डॉ दैवतराव लाटे आदींसह जिल्ह्य़ातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा भव्य स्मारकास निधी कमी पडू देणार नाहीत, अशी ग्वाही माजी आ रामप्रसाद बोर्डीकर यांनी यावेळी दिली.




