परभणी (Parbhani) :- जागतिक महिला दिनानिमित्त दैनिक देशोन्नतीच्या (Deshonnati) मनस्विनी मंच आणि आर पी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान तपासणी (Diagnostic tests) व उपचार शिबीर रविवार १६ मार्च रोजी घेण्यात आले. या शिबीरात ४८० महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरपी हॉस्पीटल मेडिकल कॉलेज आणि मनस्विनी यांचा संयुक्त उपक्रम
यावेळी डॉ. संप्रिया राहूल पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अॅड. माधूरी क्षीरसागर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. आमिर तडवी, मनस्विनी संयोजिका मनिषा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कॉ. माधूरी क्षीरसागर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महिलांनी किशोरवयीन अवस्थेपासून ते वृद्धावस्था काळात आपल्या आरोग्याकडे कायम दिले पाहिजे. असे सांगितले. आजच्या धावपळीच्या काळात घर, व्यवसाय आणि कुटूंब सांभाळताना महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढत आहे. शिवाय इतर आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे यांनी केले.प्रारंभी प्रास्तविकात महिलांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे या उद्देशाने अशा अनेक आरोग्य शिबिरातून महिलांचे आरोग्याकडे (health) लक्ष वेधून घेता येईल असे मत मनस्विनी संयोजिका मनीषा गोरे यांनी मांडले.
शिबिरासाठी मनस्वीनी विभाग प्रमुख विशाखा शिंदे, पुनम मारवा, रोहिणी हलगे, सुहासिनी कावळे व इतर मनस्विनी सदस्यांचीही उपस्थिती होती. शिबीरासाठी येणार्या महिलांसाठी आरपी हॉस्पीटलच्या वतीने बसची सुविधा उपलब्ध केली होती. शिबीर यशस्वीतेसाठी किर्ती चौधरी, वैशाली खांडे, अर्चना जाधव, कांचन राठोड, धनश्री कोठूलवार, छाया जावळे, रोहिणी हलगे, रंजना इगदे, छाया गवारे आदीनी परिश्रम घेतले.