माजी खा. किरीट सोमय्या यांची माहिती बोगस जन्म नोंदणी रद्दची मागणी..!
परभणी (Kirit Somayya) : राज्यात बांगलादेशी नागरीकांनी जन्म मृत्यू नोंद कायद्यांतर्गत बोगस जन्म नोंदणी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात केली आहे. अधिक माहिती घेतली असता परभणी शहर व तालुक्यात ३ हजार २०२ बोगस जन्म दाखले हे बांगलादेशी लोकांना दिले असल्याचे समोर आले आहे, अशी भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी खा. सोमय्या (Kirit Somayya) म्हणाले की, सहा महिन्यात राज्यात देश विघातक गँग निर्माण करण्याचे काम चालू आहे. याचे केंद्र हे मालेगाव आहे. या कटात बांगलादेश बॉर्डरवरील काही नेते सहभागी आहेत. जन्म मृत्युची नोंद कायद्यात सुधारणा झाल्याचा दुरुपयोग करत बोगस प्रमाणपत्र काढले जात आहेत. छोट्या शहरांमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसते. २ लाख बांगलादेशी भारतात घुसले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिले आहे.
मालेगावला एसआयटी मार्फत कारवाई केली जात आहे. परभणीत ३ हजार २०२ जन्म दाखले हे मागील सहा महिन्यात देण्यात आले आहेत. त्याच बरोबर अकोला, सिल्लोड, अमरावती, लातूर, भोकरदन, छत्रपती संभाजी नगर या शहरांमध्ये देखील याच पध्दतीने बोगस प्रमाणपत्र काढलेले असल्याचे समोर येत आहे. या गंभीर देश विघातक प्रक्रियेची फॉरेन्सीक ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती खा. सोमय्या यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची उपस्थिती होती.
तहसिल कार्यालय आडकणार
परभणी तहसिल कार्यालयातून जन्म नोंदणीचे प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर बोगस देण्यात आले आहेत. हा प्रकार आज उघडकीस आला. त्यामुळे या प्रमाणपत्राची चौकशी सुरू झाली आहे. तहसिल कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या प्रकरणात आडकणार आहेत.