परभणी (Parbhani Collector) : आज मा. श्री. रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी परभणी महोदय यांनी आज रोजी दुपारी 12.00 वाजता परभणीतील पाथरी तहसिल कार्यालय भेट देवुुन सर्व मंडळ अधिकारी,सर्व तलाठी, सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांची प्रलंबित वसुली, गौण खनिज प्रकरणे, प्रलंबित फेरफार प्रकरणे, अॅग्रीस्टॅक, ई पिक पाहणी, नैसर्गीक आपत्ती क्लोजर अहवाल, ई ऑफीस, प्रलंबित लेखा परिच्देद , प्रलंबीत रस्ता प्रकरणे या विषयावर आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत वसुली ,गौनखनिज वसुली दिनांक 30 मार्च 2025 पर्यंत 100 टक्के पूर्ण करणेबाबत (Parbhani Collector) मा. महोदयांनी निर्देश दिले तसेच मा. मुख्यमंत्री महोदय यांचे 100 दिवसाचे कार्यक्रम अंतर्गत agristack , प्रलंबित फेरफार प्रकरणे, सेवविषयक प्रकरणे, प्रलंबीत कार्यालयीन कामे तात्काळ पुर्ण करणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. सदरील बैठकीत मा. शैलेश लाहोटी, उपविभागीय अधिकारी पाथरी, श्री एस एन हानदेशवार तहसीलदार पाथरी, सर्व नायब तहसीलदार, सर्व सहायक महसूल अधिकारी, सर्व महसूल सहायक, सर्व मंडळ अधिकारी व सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.
