परभणी (Parbhani Court) : ब्रिटिशकालिन भारतीय दंड विधान (Indian Penal Code) व इतर कायदे इतिहास जमा होणार आहेत. सोमवार १ जुलै पासून भारतीय न्याय संहिता हे नवीन कायदे लागु होणार आहेत. या बदलामुळे गुन्ह्यात लावण्यात येणारे कलम देखील बदलले आहेत. या सोबतच दोषारोप, शिक्षा यामध्येही बदल झाला आहे. साधर्म्य असलेले काही कलम रद्द करण्यात आले असून नव्या काद्यात नवीन कलम (Parbhani Court) आणि गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता हा कायदा २५ डिसेंबर २०२३ ला पारित झाला. १ जुलै २०२४ पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
भारतीय दंड संहिता (IPC Code) यामध्ये ५११ कलम होते. आता नवीन (Indian Judiciary Code) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३५८ कलम आहेत. सारखी असलेली कलमे एकत्रिक करण्यात आली आहेत. निवडणुकी संदर्भातील सर्व अपराध एकाच कलमात आणले आहेत. तर फसवणुकींच्या कलमांचे अपराध एका कलमाखाली समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याच बरोबर भादंवि खुनाचे ३०२ चे कलम आता बीएनएस मध्ये १०१ होणार आहे. ३०७ चे कलम १०९ तर ३६३ ते ३७१ मधील कलमे ६३ ते ७१ अशी होणार आहे. विनयभंगाचे ३५४ चे कलम आणि यात समाविष्ट असलेली इतर कलमे बीएनएस मध्ये ७४ ते ७८ या दरम्यान राहतील. स्त्रीला क्रुर वागणूक देणे म्हणजे ४९८ आणि त्या संदर्भात असलेली कलमे आता ८२ ते ८५ या दरम्यान असतील. चोरी, दरोडा या सारख्या कलमांमध्येही बदल झाला आहे.
बीएनएस मध्ये चैन स्नॅचिंग तसेच एखाद्या वाहनातून वस्तुची चोरी होण्याच्या Parbhani Court प्रकरणातील गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहे.( Indian Penal Code) भारतीय दंड संहिता आता भारतीय न्याय संहिता या नावाने ओळखली जाणार आहे. त्याच बरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस), भारतीय पुरावा कायदा (इंडियन इविडन्स अॅक्ट) आता भारतीय साक्ष अधिनियम या नावाने ओळखले जाणार आहे. नवीन कायद्याची पोलीस, वकिलांना माहिती व्हावी यासाठी मे २०२४ मध्ये प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले. यामध्ये जवळपास १ हजार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवादासाठी कलम ११३ देशाचे सार्वभौम, आर्थिक स्थिरता, एकता, सुरक्षितता याला धोका पोहोचेल असे गुन्हे, दहशतवाद विरोधी गुन्हे तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे गुन्हे यांचा समावेश कलम ११३ मध्ये करण्यात आला आहे.
संघटीत गुन्ह्यांमध्ये खंडणी, भुमाफिया, दारु, वाळू यासारखे गुन्हे टोळी बनवून केल्यास बीएनएसमध्ये कलम १११ नुसार गुन्हे दाखल होणार आहेत. तसेच टोळी बनवून पाकिटमारी, चैन स्नॅचिंग, दुचाकी चोरी केल्यास कलम ११२ नुसार गुन्ह्याची नोंद होईल.
या कायद्यामध्ये अनेक नवीन तरतुदी आहेत. लवकरात लवकर न्याय मिळणे, गुन्हेगार सुटण्याची संख्या कमी होणे, गुन्हा सिध्द करण्याचे प्रमाण वाढविणे, तपासात इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणे, खटला लांबू नये म्हणून आरोपींवर बंधन तसेच वेळेची मुदत नवीन कायद्यामध्ये ठेवण्यात आली आहे.
– अॅड. डि.यु. दराडे, मुख्य सरकारी वकिल, परभणी सत्र न्यायालय