परभणी(Parbhani) :- घरासमोर येत पतीला जोरजोरात शिवीगाळ करत असलेल्या व्यक्तीला शिवीगाळ (Abusing)का करतो, अशी विचारणा केल्यावर संबंधिताने वाईट उद्देशाने २४ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. ही घटना १८ जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील गव्हा शिवारात घडली. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.
परभणी तालुक्यातील गव्हा येथील घटना आरोपीवर गुन्हा दाखल
पिडित २४ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, फिर्यादी या शेतातील आखाड्यावर असलेल्या शेडमध्ये झोपलेल्या असताना राजू लिंबाजी पवार हा आला. त्याने फिर्यादीच्या पतीच्या नावाने जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेने शेडच्या बाहेर येत आरोपीला तु शिव्या का देत आहेस, असे म्हणाल्यावर आरोपींने पिडितेला मला तु खुप आवडतेस, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो, असे म्हणत वाईट उद्देशाने हात पकडत विनयभंग (molestation) केला.
पिडितेने जोरजोराने आरडाओरड केल्याने आरोपीने घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला खतम करुन टाकतो, असे म्हणत धमकी देत निघुन गेला. आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोउपनि. तावडे करत आहेत.