परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई २१ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त…!
परभणी (Parbhani Crime Branch) : वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉपी फोडण्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले आहे. (Parbhani Crime Branch) संबंधितांकडून ८१ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले वाहन मिळून २१ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर चोरीमध्ये स्थागुशाने उमाईस अहेमद शाहेद अख्तर, साकेब अंजुम निहाल अहेमद, मुद्दसीर अहेमद मुदीर अहेमद, अकबर खान हबीब खान, खैसर खान हबीब खान पठाण यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून चोरीचे मोबाईल, साउंड बार, गुन्ह्यात वापरलेले बोलेरो वाहन जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई (Parbhani Crime Branch) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विवेकानंद पाटील, सपोनि. राजू मुत्तेपोड, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शेख रफिक, दिपक मुदीराज, मो. इमरान, रणजीत आगळे, गणेश कौटकर यांनी केली. आरोपींच्या चौकशीत जळगाव, मालेगाव, नांदेड, नाशिक आदी ठिकाणी चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.