नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Crime) : मुलासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका ४३ वर्षीय इसमावर कुर्हाडीने हल्ला (Parbhani Crime) करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शेंद्रा शेत शिवारात १३ जून रोजी सकाळी अकरा वाजता घडली. या प्रकरणी १८ जुनला नवा मोंढा पोलिसात (Parbhani Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनामकृवि परिसरातील शेंद्रा शिवारातील घटना
सुरेश जोंधळे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या मुलाचे गावातील एका सोबत किरकोळ कारणावरुन भांडण (Parbhani Crime) झाले होते. फिर्यादीने सदरचे भांडण सोडविले. यानंतर १३ जून रोजी सकाळी फिर्यादी आपल्या शेतामध्ये पाळी घालण्याचे काम करत असताना आरोपींनी संगणमत करत जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादीवर कुर्हाडी, लोखंडी रॉड, काठीने हल्ला केला. जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली. या प्रकरणी हर्षद जोंधळे, प्रमोद जोंधळे, माया जोंधळे या तिघांवर (Parbhani Police) नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




