जिल्हा रुग्णालय फसवणूक प्रकरण
जिल्हा शल्यचिकित्सकांची तत्परता
जिल्हा शल्यचिकित्सकांची तत्परता
देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Parbhani Crime) : जिल्हा सामान्य रुग्णालयात वृद्ध दांपत्यास कानाची मशीन घेऊन देतो म्हणत त्यांच्याकडून तीनशे रुपये घेत फसवणूक झाल्याचे समजतात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी तत्परता दाखवत त्या दोन्ही युवकांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात कलम १०९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा (Parbhani Crime) गुन्हा दाखल केला आहे. यामुळे रुग्णालयातील फसवणूक करणाऱ्यांवर आता चांगलाच वचक निर्माण झाला आहे.
तालुक्यातील रावराजुर येथील वृद्ध दाम्पत्य खबुतराबाई चिंतामण काळे व चिंतामण आजा काळे या वृद्ध दाम्पत्यास दोन युवकांनी गुरुवार १६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास कानाची मशीन घेऊन देतो म्हणत तीनशे रुपये घेत त्यांची फसवणूक केली होती. त्या (Parbhani Crime) प्रकरणी रुग्णालयातील एमएसएफ जवान तुकाराम बुरफुले यांनी त्या फसवणूक करणाऱ्या युवकास पकडले होते. घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .नागेश लखमावार यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात या दोन्ही युवकांवर कलम १०९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्यांवर आता चांगलाच वचक निर्माण झाला आहे..!
नादुरुस्त कॅमेरे लवकरच दुरुस्ती केले जातील…
काल वृद्ध दांपत्यास झालेली फसवणूक ही खूप वाईट आहे. त्या दोन्ही युवकांवर कलम १०९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचे (Parbhani Crime) गुन्हे दाखल केले आहेत. तसेच रुग्णालयातील कॅमेरे चालूच आहेत. काही नादुरुस्त कॅमेरे लवकरच दुरुस्ती केली जातील.
– डॉ. नागेश लखमावार, जिल्हा शल्यचिकित्सक परभणी