तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
परभणी (Parbhani Crime) : परभणीतील गंगाखेड येथे प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने दाखल केलेला पतीसह सासू व नणंदविरुद्ध दाखल केलेला गुन्हा परत घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण (Beating) करणाऱ्या तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझं तुझ्यावर प्रेम नाही असे म्हणून पतीने शिवीगाळ करून थापड बुक्क्यानी मारहाण!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील नैना विजय लटपटे हिने प्रेमसंबंधातून १० डिसेंबर २०२४ रोजी विजय उद्धवराव लटपटे याच्या आळंदी पुणे येथे विवाह केला होता. या लग्नाला सासू लक्ष्मीबाई उद्धवराव लटपटे व नणंद कावेरी उद्धवराव लटपटे यांचा विरोध असल्याने नैना विजय लटपटे हिने त्यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) केल्यामुळे लग्नानंतर एक महिना चांगले नांदवित पती विजय उद्धवराव लटपटे याने तू माझेवर, माझ्या आईवर व बहिणीवर दाखल केलेले गुन्हे परत घे असे म्हटल्याने मला थोडा वेळ द्या विचार करून सांगते असे विवाहितेने सांगताच तू आमच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून मी तुझ्या सोबत लग्न केले आहे. माझं तुझ्यावर प्रेम नाही असे म्हणून पतीने शिवीगाळ करून थापड बुक्क्यानी मारहाण केली तर तू आम्हाला आवडत नाहीस आमच्यावर दाखल केलेला गुन्हा परत घे म्हणून सासू व नणंद यांनी ही वारंवार शिवीगाळ व मारहाण करून उपाशी पोटी ठेवत मानसिक व शारीरिक छळ केल्याची फिर्याद नैना विजय लटपटे वय १९ वर्ष रा. लटपटे कॉलनी गंगाखेड हिने दिल्यावरून पती, सासू व नणंद अशा तिघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात रविवार १९ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास गंगाखेड पोलीस (Gangakhed Police) करीत आहेत.