परभणी/गंगाखेड (Parbhani Dead Body) : पोहण्यासाठी गेल्यानंतर गोदावरी नदी पात्रात रविवार रोजी दुपारी बुडालेल्या इसमाचा (Parbhani Dead Body) मृतदेह सोमवार 21 एप्रिल रोजी सकाळी मिळून आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील शेख वसीम शेख तहसीन वय 32 वर्ष हा इसम रविवार 20 एप्रिल रोजी पोहण्यासाठी गेला असता दुपारी 4 वाजेच्या सुमारास गोदावरी नदी पात्रात बुडाला होता. (Parbhani Dead Body) गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील रामविलास खंडेलवाल, शाम जगतकर, सूरज खंडेलवाल, श्रीकांत साळवे, आकाश लव्हाळे, अभिषेक साळवे, सिताराम भेंडेकर आदींनी रविवार रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत गोदावरी नदी पात्रातील पाण्यात बुडालेल्या इसमाचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्याने सोमवार 21 एप्रिल रोजी शोध मोहिमेला पुन्हा सुरुवात केली.
सकाळी 8:45 वाजता बोअर लाईनमधील पाण्यात सोडण्यात येणारा कॅमेरा बोलावून नदी पात्रात शोध घेतला असता (Parbhani Dead Body) पाण्यात बुडालेल्या शेख वसीम शेख तहसीन यांचा मृतदेह तळाशी असल्याचे दिसून आल्याने महातपुरी येथील सोपान कचरे, अफजल शेख, उमेश कचरे, महादेव लकारे, अफरूक शेख, विजय चाफळे आदींनी 9:45 वाजेच्या सुमारास शेख वसीम यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात (Parbhani Dead Body) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.