परभणी शहरातील धार रोड परिसरातील घटना
परभणी (Parbhani Death) : अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीच्या अंगावर विजेची तार तुटून पडली. जोरदार विजेचा धक्का लागुन मुलीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार २६ ऑगस्ट रोजी दुपारी दिड ते दोन च्या दरम्यान धार रोडवरील आनंद नगर भागात घडली. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आरुषी शेळके असे मयत मुलीचे नाव आहे. ही मुलगी आपल्या घराबाहेर अंगणामध्ये खेळत होती. अचानक विजेची तार तुटून मुलीच्या अंगावर पडली. विजेचा जोरदार धक्का लागल्याने सदर मुलीचा जागीच मृत्यू झाला. या (Parbhani Death) घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या परिसरातील विद्युत तारा जीर्ण झाल्या आहेत. या तारा तुटून पडत आहेत. अशाच घटनेत निष्पाप मुलीला आपला जीव गमवावा लागला. धार रोड व परिसरातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या बदलाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरीकांमधून करण्यात येत आहे.




