नियोजन विभागाने काढले आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली होती नाराजी
परभणी (Parbhani District) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवार २६ एप्रिल रोजी परभणी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर (Parbhani District) जिल्हा नियोजन अधिकारी पी.बु. परदेशी यांना चौकशीसाठी मुंबईत हजेरी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. यानंतर आता परदेशी यांना प्रशासकीय कारणास्तव एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बाबत नियोजन विभागाने २८ एप्रिल रोजी आदेश काढले आहेत.
आढावा बैठकीत (Parbhani District) जिल्हा नियोजन अधिकार्यांवर रक्कम घेतल्याचा आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात भेटण्याचा इशारा दिला. नियोजन अधिकार्यांनी सर्वच विभाग प्रमुख रक्कम घेतात, असे सांगितल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणात नेमकी काय कार्यवाही होते याकडे लक्ष लागले होते.
परभणीचे जिल्हा (Parbhani District) नियोजन अधिकारी पी.बु. परदेशी यांना प्रशासकीय कारणास्तव तात्काळ प्रभावाने एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांचे मुख्यालय अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई राहिल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे. परदेशी यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांच्या पदाचा पदभार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी रा.गं. ढोकणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.