दैठणा (Parbhani) :- परभणी तालुक्यातील दैठणा परिसरामध्ये गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कराडण्यासोबत जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडला. यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले.
फळबागांचेही मोठयाप्रमाणात नुकसान
धोंडी गावातील सूर्यकांत पारवेकर या शेतकऱ्याचा बांधलेला बैल हीच पडून दगावला तसेच बहरात आलेल्या अंबाबागेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरातील अनेक झाडे वादळी वाऱ्यामुळे पडले अनेक शेतकऱ्यांचे शेताकडे पत्रे उडून गेली. तसेच कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे