परभणी (Parbhani) :- आज स्वाभिमानी कडून राज्य सरकारने तीन दिवसा पूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची व शक्ती पीठ महामार्गाच्या अधिसूचनेची होळीत जाळुन सरकारचा जाहीर निषेध (Prohibition) करण्यात आला. होळी(holi) सण देशातील मुख्यसण म्हणुन ओळखला जातो. त्यात प्रामुख्याने असे म्हणतात दुष्टावर चांगल्याचा विजय असे म्हणतात. त्याच प्रमाणे या सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेली याची हार. या नंतर त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय मागे घेण्यास सुरुवात केली.
शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देणार जसे सोयाबीनला 6000/- रू. प्रति क्विंटल तर कापसाला 9000/- भाव
निवडणुकीत (Elections) आश्वासन मग त्यात शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देणार जसे सोयाबीनला 6000/- रू. प्रति क्विंटल तर कापसाला 9000/- रू. प्रति क्विंटल. संपूर्ण कर्ज मुक्ती. शक्ती पीठ महामार्ग रद्द करणार यान सारखी शेतकरी हिताचे निर्णय घेतले. विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भर भरून मत मारली सरकार बहुमतांनी निवडून आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि शेतकरी मारक धोरण राबविण्यास सुरुवात केली. सोयाबीनला सहा हजार भाव तर सोडाच साधा हमी भाव सुद्धा मिळत नाही. एकी कडे संपुर्ण सोयाबीन (Soyabean) नाफेडच्या मार्फत खरेदी करणार म्हणाले. खरेदी सुरू केली त्यात एक महिना खरेदी बंद राहिली का तर बारदाना नसल्या कारणामुळे. आणि एक महिन्या पासुन खरेदी बंद केली आहे. त्यामुळे सोयाबीन चे भाव कोसळले आणि शेतकऱ्याला त्यांचे सोयाबीन 3500/- रू. विकावे लागत आहे. कापसाचे, तुरीचे, हरभरा यांचे देखील असेच हाल होत आहेत. शेती पिकांचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा झाला आहे. म्हणूनच मराठवाडा व विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत.
मराठवाडा व विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या
कर्ज मुक्त करतो म्हणुन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. या अर्थ संकल्पात याची तरतूद देखील करण्यात आली नाही. निडणुकित शक्ती पीठ रद्द करतो म्हणणारे आता हा मार्ग होणारच अश्या असे बोलत आहेत. अशी दुटप्पी भूमिका राज्यातील शेतकरी (Farmer) खपवून घेणार नाही. आज देशातील होळीचा सण आहे. वाईट आवर चांगल्याची मात या सणातून देशभर संदेश जात आहे म्हणूनच आज आम्ही शेतकऱ्यांची पोर या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा होळीमध्ये दहन करत आहोत. सरकारने यावर लक्ष घालून शेतकरी विरोधी धोरण अवलंबूनये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तात्काळ करावी त्यानंतर शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. या मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली. यात सरकार ने लक्ष घालून सुधारावे अन्यथा राज्यातील शेतकरी एक दिवस या सरकारचे असेच दहन केल्या शिवाय राहणार नाही.




