खळी येथील प्रकार, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Jayanti DJ) : गंगाखेड येथे पोलीसांचे आदेश धुडकावून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकीत डिजे लावल्याने जयंती समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह डिजे मालक, वाहन मालक अशा एकुण ९ जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सण उत्सव, मिरवणुकीत पारंपारिक वाद्य लावून डिजे मुक्त सण उत्सव साजरे (Parbhani Jayanti DJ) करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील खळी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खळी येथील आण्णाभाऊ साठे सभागृह ते शिवाजी चौकापर्यंत टेम्पो क्रमांक एमएच १४ एझेड ७५७८ मध्ये डिजे लावुन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल प्रल्हाद सावळे, ज्ञानेश्वर दिलीप भालेराव, पिराजी मारोती गवारे, संतोष पांडुरंग सावळे, भगवान नारायण बाळसकर, विशाल महादेव सरोदे, अविनाश बालासाहेब सावळे सर्व रा. खळी ता. गंगाखेड यांनी जयंती मिरवणुक काढली. जयंती मिरणुकीत डि.जे. न लावण्या बाबत कलम १६८ बी.एन.एस.एस अन्वये लेखी नोटीस देत गोपनीय शाखेकडुन अटी व शर्थीनुसार परवाना देण्यात आला होता.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकी (Parbhani Jayanti DJ) दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या सपोनि सिद्धार्थ इंगळे, पोह मुंजा वाघमारे, पो. शि.भरत पवार, होमगार्ड पाळवदे, होमगार्ड बालाजी जवादे, होमगार्ड फुलपगार, होमगार्ड सय्यद, महिला होमगार्ड कराड आदींनी डिजे बंद करण्याबाबत मिरवणुकी दरम्यान वारंवार सूचना देऊन सुद्धा त्यांनी सूचना व दिलेल्या निर्देशाचे उल्लंघण केल्याबाबत पो.शि. भरत सुर्यभान पवार वय ३२ वर्ष यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून जयंती समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसह डिजे मालक राजाभाऊ माधवराव सुर्यवंशी व डिजे वाहन चालक मालक माणिक माधवराव सुर्यवंशी दोघे रा. सायळा ता. गंगाखेड अशा एकुण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार मुंजा वाघमारे हे करीत आहेत.