परभणी/पाथरी(Parbhani) :- मराठी अस्मितेला धक्का लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने(Bharatiya Janata Party) दोन पक्षाची तोडफोड केली आणि वाम मार्गाने सत्ता स्थापन केली याचा राग मराठी माणसाच्या मनात आहे . तो आज महाराष्ट्रभर(Maharashtra) दिसायला लागला आहे .लोकसभेप्रमाणे विधानसभेत ताकदीने काम करा सरकार आपलेच येणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे ते पाथरी येथे शिवस्वराज्य यात्रा सभेत बोलत होते .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे .शनिवार 17 ऑगस्ट रोजी ची यात्रा पाथरी येथे पोहोचली होती .यावेळी शहरातील जिल्हा परिषद मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते .सकाळी 11 वाजता सुरू होणारी सभा दुपारी साडेबारा वाजता सुरू झाली . सभा मंचावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,खा . अमोल कोल्हे , आ . राजेश टोपे , खा .फौजिया खान ,माजी आ. बाबाजानी दुर्राणी , युवक प्रदेशाध्यक्ष सुरेश गव्हाणे ,महबूब शेख ,जिल्हाध्यक्ष माजी आ. विजय गव्हाणे ,अशोकराव डक ,भीमराव हत्तीअंबीरे , सोनाली देशमुख पंढरीनाथ कांबळे , नागेश फाटे , मुजाहिद खान ,जुनेद दुर्राणी , संतोष देशमुख ,दत्तराव मांयदळे,सुभाष कोल्हे राजेश ढगे, तारेख दुर्राणी, किरण सोनटक्के, आदींची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी माजी आ .बाबाजानी दुर्राणी, मेहबूब शेख, खा. फौजिया खान , आ .राजेश टोपे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे डॉ . अमोल कोल्हे यांचीही भाषणे झाली.
दुर्राणींना विधान परिषदेवर नाही विधानसभेत पाठवणार
यावेळी पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की ‘ धर्मनिरपेक्षतेचा बिमोड सत्ताधाऱ्यांनी केला आहे . महाराष्ट्रात विकासाच्या अनेक प्रश्न आहेत .महागाई वाढत आहे , महागाई वाढवण्यात राज्य सरकारने आणि केंद्राने हातात हात घालून काम केले आहे . फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावर मोठा प्रकल्प आणतो म्हणणारे सव्वा वर्ष झालं तरी त्यांचा मोठा प्रकल्प आला नाही अशी टिका सरकारवर यावेळी त्यांनी केली .माजी आ. दुर्राणी यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की ,बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षाला ताकद देण्याचे काम केले आहे . ज्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी दुर्राणी असं गणित आहे . पाथरी विधानसभेत दुर्राणी यांचं वलय असून पक्षांनी केलेल्या सर्व सर्वेक्षणात बाबाजानी दुर्राणी निवडून येतील अशी शक्यता वर्तवली आहे .दुर्राणींना विधान परिषदेवर नाही तर विधानसभेत पाठवणार असल्याचे वक्तव्य यावेळी जयंत पाटील यांनी केले .
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची भूमिका स्पष्ट करा !
सभा चालू असताना मंचाववर अचानक पाथरी तालुक्यातील मराठा समन्वयक आले . त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करणारे निवेदन दिले . मराठा समन्वयकांनी दिलेले निवेदन वाचून दाखवत २९ ऑगस्ट पूर्वी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा अन्यथा आगामी विधानसभानिवडणुकीत सर्वांचा सुफडा साफ करू असा इशारा यावेळी दिला .
शाहू ,फुले ,आंबेडकरांच्या विचारांची गरज राज्याला व देशाला आहे .सध्या समाजात ध्रुवीकरण करत सत्तेत येण्याचा प्रयत्न चालू आहे .अठरापगड जातींना सोबत घेऊन सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी धर्मनिरपेक्ष लोकांनी सत्तेत येण्याची गरज आहे .देशात मुस्लिमांची हिंदूशी कधीही स्पर्धा नाही , नोकरी , शेती ,राजकारण कुठेही स्पर्धा दिसत नाही तरीही मतांसाठी जातीवाद करणे चालू आहे . जातिवाद करणाऱ्या सत्तेतल्यांना शांततेत तडीपार करायच आहे . सत्ता परिवर्तन अटळ आहे . महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे .
२०१३ साली गळ्यात टाळ घालून कापसाला दहा हजार भाव देऊ , सोयाबीनला सहा हजार भाव देऊ म्हणणाऱ्यांच्या राज्यात कापसाला सहा हजार तर सोयाबीनला चार हजार भाव असुन एकोणवीस लाख टन खाद्यतेल आयात करत शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे . राज्यात अडीच लाख जागा रिक्त असून १७ उद्योग धंदे दुस-या राज्यात नेल्यांने तरुणांचा रोजगार हिरावून घेतला असून गुजरातला उद्योग देणाऱ्यांनी आता मते मागायला गुजरातला जावं .