महिलेचा शोध सुरू; माहिती देण्याचे नागरिकांना आवाहन
नवजात बाळाची प्रकृती नाजूक…!
परभणी (Parbhani Missing woman) : मानवत ते सेलू रेल्वे प्रवासादरम्यान १३ ऑगस्ट 2 २०२५ रोजी अर्चना गणपत निकम (रा. आंबेडकर नगर, नांदेड (रुग्णालयाच्या रेकॉर्डनुसार)) या महिलेची प्रसूती झाली. सेलू येथील प्राथमिक उपचार केंद्रात प्राथमिक उपचारानंतर तिला व बाळाला परभणी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सदर महिला कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेली.
बेपत्ता महिला किंवा तिच्या नातेवाईकांबाबत कुणाला काही माहिती असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, परभणी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन : १०९८, कोतवाली पोलीस स्टेशन, (Parbhani Missing woman) परभणी, स्त्री रुग्णालय, परभणी, बालकल्याण समिती, परभणी, येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी केले आहे.
दरम्यान, नवजात बाळाची प्रकृती नाजूक असून त्याची काळजी (Parbhani Missing woman) स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु दक्षता विभाग तसेच आशा शिशु गृह, परभणी येथील कर्मचारी घेत आहेत. या प्रकरणाची नोंद कोतवाली पोलीस स्टेशन, परभणी येथे करण्यात आली असून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.




