परभणी शहरातील नानलपेठ पोलिसांच्या पथकाने गंगाखेड शिवारातून पकडले!
परभणी (Parbhani Murder) : विशाल आर्वीकर खून प्रकरणात (Vishal Arvikar Murder Case) नानलपेठ पोलिसांच्या पथकाने फरार असलेल्या आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. रविवारी मध्यरात्री गंगाखेड शिवारातून तिघांना पकडण्यात आले. सदर प्रकरणात ताब्यात असलेल्या एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे.
सदर प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची संख्या पाच झाली!
परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे कमानी जवळ शुक्रवार 9 मे रोजी रात्री विशाल आर्वीकर याचा खून करण्यात आला. सदर प्रकरणात नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. नानलपेठ पोलिसांनी (Nanalpeth Police) तात्काळ हलचाल करत शुभम पाष्टे, गोविंद उदावंत या दोघांना ताब्यात घेतले. सदर आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोनि. चितांबर कामठेवाड, सपोनि. खजे, पोलीस अंमलदार संतोष सानप, आसाराम दवंडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गंगाखेड शिवारातून विकी पाष्टे, गोविंद उर्फ गोपाळ पाष्टे, तुषार सावंत यांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची (Accused) संख्या पाच झाली आहे. नव्याने ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना न्यायालया (Courts) समोर हजर करण्यात आले आहे.




