पंढरपूर यात्रे दरम्यान बेपत्ता झाली होती महिला
परभणी/गंगाखेड (Parbhani police) : पंढरपूर यात्रे दरम्यान बेपत्ता झालेल्या मनोरुग्ण महिलेला गंगाखेड पोलीसांमुळे (Parbhani police) नातेवाईक मिळाल्याने रात्र गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे. शहरातील यज्ञभुमी परीसरात दि. १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या वेळी अंदाजे ३० ते ३५ वर्ष वयोगटातील एक महीला फिरत असल्याची व ती मनोरुग्ण असल्याची माहीती मिळाल्याने रात्र गस्तीवर असलेले सपोनि शिवाजी सिंगणवाड, पोउपनि डोईफोडे, महीला पोलीस अंमलदार स्नेहल जिकलवाड, चालक पोलीस अंमलदार सुग्रीव सावंत आदींनी महीला दक्षता समीती सदस्या सूर्यमाला मोतीपवळे यांना सोबत घेऊन तात्काळ यज्ञभुमी परीसरात जाऊन महीलेचा शोध घेतला असता वीज वितरण कंपनीच्या कोद्री रोडवरील कार्यालयाच्या पाठीमागे अंधारात सदर महीला झोपलेली दिसली.
तिला विचारपूस करून माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता या महिलेने फक्त गावाचे आणि जिल्हयाचे नाव सांगितल्याने (Parbhani police) महीला पोलीस अंमलदार स्नेहल जिंकलवाड, महीला दक्षता समीती सदस्या श्रीमती मोतीपवळे यांनी तिला पोलीस स्टेशनला आणुन अधिक विचारपुस केली असता ती महीला फक्त गावाचे आणि जिल्हयाचेच नाव सांगत असल्याने सपोनि शिवाजी सिंगणवाड यांनी पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे संपर्क साधुन लोणबेहळ हे गाव नेमके कोणत्या तालुक्यात आहे.
याबाबत माहीती घेतली तेंव्हा लोणबेहळ हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असल्याचे समजताच तेथील (Parbhani police) स्थानिक पोलीसांच्या मदतीने मनोरुग्ण महीलेच्या नातेवाईकांना त्याच रात्री संपर्क साधुन समन्वय साधला असता तेंव्हा आमचे कुटुंबीय आषाढी एकादशीला पंढरपुर यात्रेस गेलो होतो तेथुन सदर महीला कुठे बेपत्ता झाली हे आम्हाला माहीत नव्हते असे नातेवाईकांनी सांगीतले तेंव्हा या नातेवाईकांना गंगाखेड पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यांनी मनोरुग्ण महीलेचे नाव अनिता मंगल पिलावल रा. लोणबेहळ ता.आर्णी जि.यवतमाळ असे सांगत ओळख पटवुन ताब्यात घेतले. आषाढी एकादशी दरम्यान हरवलेली महिला सुस्थीतीत सापडल्याने महिलेला पाहून नातेवाईकांच्या डोळयात आनंदाश्रु आले व त्यांनी समाधान व्यक्त करून गंगाखेड पोलीसांचे आभार मानले.