हिंगोली (Bhagwan Parasuram Udyan) : शहरातील एनटीसी भागामध्ये नगरपालिकेने दिलेल्या जागेवर भगवान परशुराम उद्यान (Bhagwan Parasuram Udyan) तयार करण्यात येत आहे. त्या निमित्ताने आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी यापूर्वीच उद्यानातील विविध विकास कामाची घोषणा करून निधीही जाहीर केला होता.
त्या निमित्ताने उद्या 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता उद्यानात विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांची उपस्थिती राहणार आहे. या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याला सकल ब्राह्मण समाजासह इतरांनी उपस्थित रहावे असे आवाहन (Bhagwan Parasuram Udyan) भगवान परशुराम उद्यान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.