पाथरी उपविभागीय दंडाधिकारी यांनी हद्दपारीचे आदेश!
परभणी (Parbhani Police) : परभणीतील पाथरी पोलीस ठाणे (Pathari Police Station) हद्दीतील 3 सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) अधिनियमनुसार विविध कलम अंतर्गत पाथरी उपविभागीय दंडाधिकारी (Sub-Divisional Magistrate) यांनी हद्दपारीचे आदेश (Deportation Order) दिले आहेत.
एक वर्षाकरिता नोटीस देवून जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले!
हद्दपार (Deportation) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगार प्रताप बाजीराव इंगळे (वय 25, रा. बोरगव्हाण) यास परभणी, जालना व बीड जिल्ह्यातून एक वर्षाकरिता, श्याम नामदेवराव हरकळ (वय 25, रा. रेणाखळी) यास नांदेड व बीड जिल्ह्यातून 6 महिन्याकरिता व भगवान रामचंद्र पौळ (वय 47, रा. तारूगव्हाण) यास परभणी, हिंगोली, नांदेड व बीड जिल्ह्यातून एक वर्षाकरिता नोटीस (Notice) देवून जिल्ह्याबाहेर सोडण्यात आले आहे. ही कारवाई (Action) पोलीस अधीक्षक परदेशी, अपर पोलीस अधीक्षक काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (सेलू) डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश लांडगे, सपोनि घायवट, सपोनि स्वामी, पो. अं. सुनील लोखंडे, सुरेश कदम व विष्णू वाघ यांनी केली.