गंगाखेड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन!
परभणी (Parbhani River) : परभणीतील गंगाखेड येथे गोदावरी नदी पात्रात सापडला अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याची घटना मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी तालुक्यातील नागठाणा येथे घडली. मयत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील हनुमान सोमनाथ इंदरके हे गोदावरी नदी पात्राकडे गेले असता त्यांना नदी काठावर पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगतांना दिसल्याने त्यांनी याची माहिती सरपंच मनोहर वैजनाथ कदम यांना दिली. अंदाजे ६० ते ६५ वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. मात्र त्या महिलेची ओळख पटली नसल्याने याप्रकरणी सरपंच मनोहर वैजनाथ कदम वय ३५ वर्ष रा. नागठाणा ता. गंगाखेड यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या अनोळखी वृद्ध महिलेची ओळख पटविण्यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, तपास अधिकारी सपोनि सिद्धार्थ इंगळे यांनी केले आहे.
औषध प्राशन केलेल्या अनोळखी इसमाचा मृत्यु!
गंगाखेड : विषारी औषध प्राशन केलेल्या अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की मंगळवार १४ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ अंदाजे ६० वर्षीय इसम बेशुद्ध अवस्थेत असल्याने महादेव होळगे रा. ज्ञानेश्वर नगर गंगाखेड यांनी त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर प्रथमोपचार करून परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले असता सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान मयत झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकी अंमलदार सपोउपनि एच. एच. नैताम यांनी दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सपोनि राम गिते करीत असुन या अनोळखी इसमाची ओळख पटवावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.