शिवसेना उबाठा गटाचे परभणीतील उपोषण मैदान येथे जनआक्रोश आंदोलन
परभणी (ShivSena Andolan) : महाराष्ट्र सरकारमधील कलंकित भ्रष्ट नेत्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सोमवार ११ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण मैदान येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
महायुती सरकार मधील कलंकित भ्रष्ट मंत्र्यांनी सर्व सामान्यांचे प्रश्न गंभीर असताना बेताल वक्तव्य केले आहे. यामुळे शेतकर्यांच्या, नागरीकांच्या भावनेला ठेस पोहोचली आहे. मंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. महायुती सरकारमधील काही मंत्री डान्सबार चालवतात, काही मंत्री सभागृहात रम्मी जुगार खेळतात तर काही मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसतात. सबळ पुरावे असताना देखील सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.
सरकारने निवडणुकीत दिलेली अश्वासने देखील पाळली नाही. राज्यातील सर्व विद्यार्थीनींना उच्च शिक्षण मोफत असा शासन निर्णय काढला आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शिष्यवृत्ती दिली जात नाही, शेतकर्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले आहे. लाडक्या बहिणींना अपात्र करत योजनेतून वगळण्यात येत आहे. या सर्व बाबींकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. (ShivSena Andolan) आंदोलनाला शिवसेना जिल्हा प्रमुख रविंद्र धर्मे, माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, कृउबा सभापती पंढरीनाथ घुले, उप जिल्हा प्रमुख माणिक आव्हाड, संजय घाडगे, विष्णू मुरकूटे, दशरथ भोसले, सदाशिव देशमुख, बंडू लांडगे, युवा सेना जिल्हा प्रमुख दिपक बारहाते, महिला आघाडी जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे, उप जिल्हा प्रमुख मंगला कथले, सुरेखा शेवाळे, संजय सारणीकर, राम खराबे, राजेश पांचाळ, सुरेश लोंढे, अविनाश जाधव, दिनेश बोबडे, जनार्धन सोनवणे, रणजीत गिराम, मारोती बनसोडे, भगवान पायघन, मुंजा कोल्हे, रामेश्वर बहिरट, माणिकराव काळे, अनिल सातपुते, डॉ. चौधरी, राम वर्मा, रावसाहेब रेंगे, अरविंद देशमुख, धनंजय देशमुख, बापुराव गमे, प्रल्हाद लाड, दामोधर घुले, पप्पु वाघ, हरीभाऊ वाकणकर, पांडुरंग शिंदे, संतोष गवळी, रामचंद्र आमले, वैभव वैद्य, अनिल जाधव, कृष्णा पिंगहे, रामेश्वर पवार, ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल काळबांडे, दिपक कटारे, संतोष जाधव, बंडू मुळे, रुस्तुम मांडे, आत्माराम वाघ, सचिन राष्ट्रकुट, मुंजाजी गिराम, परमेश्वर सुकरे, बाळासाहेब शिंदे, दगडू काळदाते, वसंत देशमुख, मोतीराम खटींग यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.