जिल्हापरिषद सीईओ चा तडका फडकी निर्णय…!
परभणी (Parbhani Zilla Parishad) : कर्तव्यात गैरशिस्त आणि कसुर करणे (Parbhani Zilla Parishad) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील शाळेवरील (School teacher) शिक्षिकेला जि.प. सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. या बाबत १२ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी आदेश काढले आहेत.
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील शिक्षिका जि.प. सीईओंनी काढले आदेश
सिमा राजेंद्र पौळ प्राथमिक शिक्षिका (Parbhani Zilla Parishad) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देऊळगाव दुधाटे ता. पूर्णा, असे निलंबीत करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना न शिकविणे, विद्यार्थ्यांना रागविणे, (School teacher) शाळेच्या वेळेत मोबाईल पाहणे, चाचण्या न घेणे, शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांच्या विषयी अपमानकारक लिखाण करणे, विनयभंगाची केस करण्याची धमकी देणे.
जेल मध्ये टाकण्याची भाषा करणे आदी बाबी चौकशी अहवालात पुढे आल्या. शालेय वातावरण दुषित करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याने संबंधित शिक्षिकेला (Parbhani Zilla Parishad) जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. (School teacher) निलंबनादरम्यान त्यांचे मुख्यालय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जिंतूर हे राहिल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.