परभणीतील बोरी पोलीसांच्या पथकाची करवली शिवारात कारवाई
जिंतूर (Parbhani) : बोरी येथील पोलीसांच्या पथकाने कोक ते राहिला पिंपरी जाणार्या रोडवर करवली (Karwali) शिवारात अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई केली. शुक्रवार 24 जानेवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास केलेल्या कारवाईत (Action) पोलीसांनी 4 कोटी 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी बोरी पोलीसात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बोरी पोलीसांच्या पथकाला (Bori Police Squad) करवली शिवारात अवैधरित्या गौण खनिजांचे उत्खनन सुरु असल्याची माहिती मिळाली होती. सपोनि. सुनिल गोपिनवार, पोलीस अंमलदार कंठाळे, कोकाटे, दिलावर, तुपसुंदरे, दंडवते, मोबिन यांच्या पथकाने करवली शिवारात छापा टाकला. यावेळी त्यांना परवाना एका ठिकाणचा आणि उत्खनन दुसर्या ठिकाणी होत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी 9 हायवा आणि 1 पोकलेन मशिन मिळून 4 कोटी 18 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. काही संशयीतांनाही पकडण्यात आले आहे. मुद्देमाल पोलीस ठाण्यात (Police Station) लावण्यात आला आहे.