उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आ. राजेश विटेकर यांची मागणी
परभणी/सोनपेठ (Industrial Estate) : परभणी तालुक्यातील मौजे बाभूळगाव व उजळअंबा या ठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली होती. मात्र या प्रमुख मागणीसाठी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन (Industrial Estate) औद्योगिक वसाहत भूसंपादन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
परभणी तालुक्यातील बाभूळगाव व उजळअंबा या परिसरात भूसंपादन आभवी औद्योगिक वसाहत स्थापन होत नसल्याने हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याठिकाणी औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी यासाठी आ. राजेश विटेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर तात्काळ राज्याचे उद्योगमंत्री (Uday Samant) उदय सामंत यांनी (Industrial Estate) औद्योगिक वसाहतचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भूसंपादन बाबतीत प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी आशा सुचना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर बाभूळगाव – उजळअंबा येथे नवीन (Industrial Estate) औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे.तसेच या गावाच्या शेजारून समृध्दी महामार्ग जाणार आहे. यादृष्टीकोनातुन महाराष्ट्र शासनाने नवीन औद्योगिक धोरण अधिनियम २०२५ जाहिर केले असून, यामध्ये आगामी पाच वर्षांत महामार्ग लगत असलेल्या ठिकाणी नवीन उद्योग,हब विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातीत नव उद्योजकांना औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंडाची गरज भासणार आहे.
त्यासाठी पाथरी विधानसभा मतदारसंघातील बाभूळगाव -उजळअंबा येथे अतिरिक्त परभणी टप्पा १ अंतर्गत ७०२ हेक्टर जमीन अधिसूचित केली असून त्यास उच्च अधिकारी समितीने मंजुरी दिली असून सन २०११ दरम्यान प्रकरण ६ ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.त्याचबरोबर ३२(२) व संयुक्त मोजणी करण्याची प्रक्रिया झाली आहे. परंतु हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून दर निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य मोबदला देऊन जमीन ताब्यात घेण्याची गरज होती. परंतू प्रशासकिय स्तरावर या प्रकरणी दिरंगाई होत आहे. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन मंत्री महोदयांना दिले आहे.
या निवेदनाची मंत्री महोदयांनी दखल घेत तात्काळ प्रधान सचिव उद्योग यांच्या स्तरावर बैठक घेऊन याबाबत दर निश्चित, मावेजा वाटप करून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन प्रत्यक्ष औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल. याबाबत आदेश करावेत व बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती आमदार राजेश विटेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कडे केली आहे. त्यावर मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत पुढील महिन्यात या संदर्भात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या (Industrial Estate) औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.