बुलढाणा (Dr. Rajendra Shingane) : काही दिवसापासून काठावर असलेले बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आ. डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी, आज शनिवार 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या पार्लमेंटरी बोर्डात पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला.. यावेळी त्यांचे जेष्ठ नेते ना. शरदचंद्र पवार, यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे, हर्षवर्धन पाटील व अन्य नेत्यांनी स्वागत केले.
सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांचे पवार गटात स्वागत केले. याप्रसंगी बुलढाणा जिल्ह्यातून रामप्रसाद शेळके, संतोष रायपुरे, नरेश शेळके व अशोकराव पाटील उपस्थित होते.




