महाशिवरात्रीनिमित्त आपदा मित्रांची सुरक्षा मोहीम.!
पारशिवनी (Parseoni) : पारशिवनी तालुक्यात स्थित घोगरा महादेव (Ghogra Mahadev) ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त प्रामुख्याने महादेवाची यात्रा भरते. या यात्रेमध्ये भक्तांचे कुठल्याही प्रकारची हाणी होऊ नये म्हणून, आपदा मित्रांनी (Aapda Mitra) सामोर येऊन कामगिरी बजावली, त्यांच्याबरोबर DDMO ऑफिसर, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस प्रशासनाने, या सर्वांनी धुरा सांभाळली.
या अगोदर दरवर्षी तिथे जिवितहानी व्हायची, आपदा मित्रांच्या सहकार्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपदा मित्रांची ही मोहीम (Campaign) उपयोगी ठरत आहे. जिवितहानी टाळण्यासाठी, दर्शनाला जाताना नदीपात्रात कोणीही उतरू नये, असे आव्हान आपदा मित्रांकडून करण्यात आले. तिथे उपस्थित संस्थेच्या स्वयंसेवकांचे (Volunteer) देखील योगदान लाभले.
भाविकांना (Devotee) सेवा पुरवण्यासाठी व त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपदा मित्रांनी मोलाची कामगिरी बजावली. उपस्थित DDMO अंकुश गावंडे, तहसीलदार (Tehsildar) सुरेश वाघचवरे, नायब तहसीलदार रमेश पांगोटे, तलाठी गणेश चौहान, श्याम मस्के, मनोज मोहोने, धनराज बडवाईक, योगेश नंदुलकर, गौरव तिरोडे इत्यादींचे सहयोग लाभले.