राज्यराणी एक्सप्रेसमधील प्रकार
अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Railway Crime) : रेल्वे प्रवासात प्रवाशां जवळील सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यराणी एक्सप्रेसने प्रवास करताना एका प्रवाशा जवळील २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे परभणी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर समजले. या प्रकरणी अनोळखी चोरट्यावर १७ सप्टेंबरला (Parbhani Railway Crime) लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षयकुमार आठवले यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे मुंबई ते नांदेड, असा राज्यराणी एक्सप्रेसने प्रवास करत होते. परभणी रेल्वे स्थानक येण्या अगोदर त्यांना त्यांच्या आईजवळील पर्स चोरीला गेल्याचे समजले. सदर पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. त्याच बरोबर रायपुर – परभणी एक्सप्रेसने (Parbhani Railway Crime) प्रवास करताना निरगुना पवार या महिले जवळील सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल मिळून ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्याने लंपास केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली.
रेल्वे प्रवासात (Parbhani Railway Crime) मोबाईल चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. पूर्णा – परळी पॅसेंजरने प्रवास करताना परभणी स्थानकावर शशिकांत माने यांच्या जवळील मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. तसेच अमरावती – पुणे या रेल्वेने प्रवास करताना पूर्णा रेल्वे स्थानकावर सुभाष जिंकलवार यांच्या ताब्यातील ३४ हजार ८०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेला आहे. रेल्वेत गस्त वाढवावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.