परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथील घटना
आईच्या तक्रारीवरुन पाथरी पोलिसात गुन्हा
परभणी (Pathari Crime) : घरात लोखंडी पेटीमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून १ लाख १५ हजार २०९ रुपयांच्या मुद्देमालावर मुलानेच डल्ला मारला. ही घटना सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथे घडली. या प्रकरणी आईने दिलेल्या तक्रारीवरुन १९ फेब्रुवारीला पाथरी पोलीस ठाण्यात मुलावर (Pathari Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदाबाई वाघमारे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या सुनेला माहेरी सोडण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी गेल्या होत्या. १५ फेब्रुवारीला त्या परत आल्या.
यावेळी त्यांना घराच्या दाराचे कुलूप उघडे दिसले. घरात जावून पाहणी केल्यावर त्यांना लोखंडी पेटीतील सोन्याचे दागिने, रोकड दिसून आली नाही. या बाबत त्यांनी पतीला विचारणा केल्यावर त्याने रात्रीच्या सुमारास मुलगा राजू आला होता व तो घरात काहीतर सापडत होता, असे उत्तर दिले. मुलानेच घरातून सोन्याचे दागिने, रोकड चोरुन नेले. या प्रकरणी राजू यादवराव वाघमारे याच्यावर (Pathari Crime) पाथरी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मुलानेच घरातील १ लाख १५ हजार २०९ रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.




