लातूर (Latur) :- लातूर जिल्हा परिषदेत मंगळवारी झालेल्या पेन्शन (Pension) अदालती विटासन अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने जिल्ह्यातील पेन्शनर संघटनेने अखेर संताप व्यक्त करत या अदालतीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओंना भेटण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी गेले, मात्र तेही न भेटल्याने अखेर जिल्हा परिषदेचे वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे यांच्याकडे या संघटनेने आपले गाऱ्हाणे मांडले.
पेन्शनर संघटनेचा बहिष्कार; वित्त अधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडले गाऱ्हाणे
यावेळी पेन्शनर संघटनेने (Pensioners Association) आर्थिक संबंधीच्या सर्व प्रश्नावर चर्चा केली. पेन्शन एक तारखेला व्हावे, तसेच गटविमा वेळेवर मिळावा, तसेच जीपीएफ वेळेवर मिळावे, असे अनेक प्रश्नांसंबंधित जिल्हाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सविस्तर चर्चा केली. अनेक प्रश्न मांडले वित्त अधिकारी चाटे यांनी सर्व प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सर्व प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन दिले. तसेच निलंगा पंचायत समिती पेन्शन उशिरा झाल्याबद्दल बिराजदार यांनी प्रश्न मांडले व निलंगा पंचायत समितीमध्ये आर्थिक व्यवहार वेळेवर होण्यासंबंधी चाटे यांच्यासमोर आक्रमक भूमिका बिराजदार यांनी मांडली. तसेच शिरूर अनंतपाळचे धनाजी लखनगावे यांनी पेन्शन विक्रीचे पैसे मिळण्याअगोदरच हप्ता कपात होत आहे, यावर चर्चा केली. तसेच अहमदपूर बालाजी शिंदे, उच्चेकर, भिंगोले यांनीही चर्चा केली. तसेच औसा पंचायत समिती अंतर्गत सर्जे यांनी चर्चा केली. लातूर पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मण दावणकर व अशोक सूर्यवंशी यांनी चर्चा केली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पवार बालाजी शिंदे, उच्चेकर, लखनगावे, सरजे, भिंगोले, बिराजदार, सुरेखा उसतुर्गे, जीवनकला महाराज, लक्ष्मण दावणकर, अल्लाबक्ष शेख, खानापूरे, भंडारे, अशोक सूर्यवंशी, करीम बागवान, जाधव, मोहन माकणे व सर्व तालुक्यातून बहुसंख्य असे सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. असेच वेळोवेळी सर्वजण उपस्थित राहून बैठक किंवा अदालत असो प्रत्येक कार्यक्रम मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून पार पाडावा व सेवानिवृत्त शिक्षक बंधू भगिनी यांना सभासद करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले.