आखाडा बाळापूर (Person died) : कळमनुरी तालुक्यातील काळ्याची वाडी येथील ४५ वर्षीय शेतकरी शेतातील विहिरीत मोटार लावण्याकरीता उतरत असताना पाय घसरून विहिरीतील दोरी व मोटरच्या पाईप मध्ये अडकून त्याचा (Person died) मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील काळ्याची वाडी येथील विश्वनाथ हरीभाऊ फोफसे (४५) या शेतकर्याला १ एकर शेती असून २० मार्च रोजी शेतातील विहिरीमध्ये मोटार लावण्याकरीता उतरत होते. यावेळी दोरीच्या सहाय्याने उतरत असताना अचानक झाड तुटून विहिरीत पडल्याने ते विहिरीत घासत गेले. त्यांच्या (Person died) पोटाला दोरीमुळे गंभीर दुखापत झाल्यामुळे ते दोरीवर अडकून पडले. त्यांनी मदतीकरीता बरीच आरडा ओरड केली. परंतु परिसरात कोणी नसल्याने मदत मिळू शकली नाही.
नेहमी प्रमाणे विश्वनाथ हे घरी आले नसल्याने त्यांच्या पत्नीने शेतात जाऊन पाहणी केली असता विश्वनाथ हे विहिरीत दोरीला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, पोलिस उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार राजीव जाधव, शेख अन्सार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतील मृतदेह आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. २१ मार्च रोजी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. (Person died) त्यांच्या पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.




